वक्रतुंड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वक्रतुंड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

विनायकास मागणे

मागणे
*******

गुणाकार मन माझे गणाकार व्हावे आता 
अहंकार भंग करी देवा तुच एकदंता ॥

देह बुद्धी नको आता मागणे हे वक्रतुंडा 
संत संग देई सदा सांगणे हे शिवसुता

काम क्रोध वारुनिया शुद्ध करा भालचंद्रा 
मोह लोभ मत्सरादी गिळून घ्या लंबोदरा ॥

प्रीत तुझी लाभू दे रे सदोदित गजवक्रा 
तारी मज संकटात तू सदा विघ्न राजेंद्रा ॥

कालभय नको आता वारी वारी गजानना 
पाप ताप भय चिंता दूर करी धूम्रवर्णा ॥

सर्व काळी सर्व ठाई विघ्नहर्ता तुच देवा
भयास भय दाखवी रुप तुझे विकटमेवा ॥

चिंतामणी नाव तुझे सार्थ असे गणपती 
मागतो मी ज्ञान भक्ती विनायका तुजप्रती ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

धिंडोरा

धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा    दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून  वर्णीतो  रूपाला गातसे  कीर्तीला जागोजागी ...