*******
माई तुझी कृपा अनंत अपार चाले पायावर देह माझा ॥
अगा हे चालणे असे तुझे देणे
अन्य न मागणे मज काही ॥
चालती हे जन किती भराभर
पाय करकर वाजवत ॥
तयांचे चालणे रोजचे जगणे
सहज कापणे अंतर ते ॥
देह हा दुर्बळ वेदनांचे घर
नेलेस तू पार कृपा तुझी ॥
याहून गं मोठा नसे चमत्कार
वाहिलास भार सवे माझा ॥
अशक्य ते शक्य केलेस तु माय
जाणतो मी भाग्य माझे इथे ॥
विक्रांत पुण्याचा जाहला प्रवाह
विसावाला देह तीरी तुझ्या ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️