****
मी रे माझ्यात एकटा चाले प्रकाशाच्या वाटा
दिसे अंधार भोवती
सारा जाणूनिया खोटा
मुग्ध एकांत कोवळा
माझेपण नसलेला
शत होऊनिया लाटा
जसा सागर वेगळा
वाहे अनंत हा वात
कधी वादळी वा शांत
नभा ज्ञात नच काही
राहे उगा ते निवांत.
का रे मिरवावे उगा
क्षण स्तब्ध मनातले
नच बोलणे ऐकणे
मौन प्राणात दाटले
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .