प्रेमगीत . लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमगीत . लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २७ जून, २०२१

प्रित

प्रित
****

ओघळून मेघ 
चुंबतो अवनी 
कळल्यावाचुनी 
तिजला ही 

अन मग देही 
विज थिरकते 
नि धडधडते 
हृदयात 

कळता धरती 
जरा लाजते 
अन मोहरते 
रोमरोमी 

मेघ बरसतो 
स्वतः हरवतो 
अंगची होतो 
जणू तिचे 

सुंदर सजले 
द्वैतची सरते 
ऐक्य नांदते 
नवलाचे 

युगायुगांची 
प्रीत तयांची 
जरी ऋतुची 
नित्य नवी 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...