नृसिह सरस्वति स्वामी महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नृसिह सरस्वति स्वामी महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

नको मज हंडा






नको मज हंडा

****

तुझ्या मोहरांचा
नको मज हंडा
राहू दे घेवडा
दारातला ॥
.
नित्य येई घरा
सेवा ही स्वीकारा
अनित्याचा वारा
नको दत्ता ॥
.
देऊनी संपत्ती
जर तुझे जाणे
नको देऊ देणे
मज असे ॥
.
संपत्तीने मद
देवा घडतसे
जगी दिसतसे
सर्वत्र हे ॥
.
म्हणूनिया देई
अन्न पोटभर
वस्त्र अंगावर
पुरे असे ॥
.
धन उधळणे
व्याख्या ही सुखाची
वाच्छा भोगण्याची
नसू देरे ॥
.
विक्रांत जीवन
तुझ्या कृपेन
जाऊ दे भरून
दया घना॥
.

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...