'अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
'अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

हौस

  
हौस
******
कामनेचा खेळ 
पुरे हा दयाळा 
घेई रे पदाला 
तुझ्या आता ॥१

फाटलेले वस्त्र 
जरी भरजरी 
पुसण्यास परी 
राहू दे रे ॥२

नको पांघरूस 
नको मिरवूस 
पुरव  रे हौस 
भक्तीची ही ॥३

राहू दे होवून 
तुझा दास आता 
आणिक विक्रांता 
नको काही॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 



मनशून्य

शून्य **** मनाच्या गाभारी प्रगटले शून्य  जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१ मोडले पडले इमले बांधले  स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२ वात ...