शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

बोलव रे दत्ता






बोलव रे दत्ता
चालव रे आता
घालव रे दत्ता
मी पण हे ||

जाहलो उर्मट
करी कटकट  
करावा ना वीट
परी माझा

घालवू  नकोस
धुत्कारू नकोस
अडाणी भक्तास
रित्या हाती

असशी दयाळू
तू माय कृपाळू
प्रीत आळूमाळू
असो द्यावी

वर्षून कृपेसी
घेई हृदयाशी
ठाव पायाशी
देईं मज

कधी रागावसी 
तू फटकारशी  
धरुनी प्रेमासी   
मी चुकता |

राहीन दारात
तुझिया पथात
घेवूनि हातात
प्राण माझे |


विक्रांत प्रभाकर तिकोणे


दत्त माझा देव






दत्त माझा देव 
माझ्या ह्रदयात  
मज दिनरात 
सांभाळतो ||
सरल्या आयुष्या 
वर्ष आन देतो
प्रारब्धा ठेवितो 
सोडवून ||
लायकी वाचून 
यश दे भरून
काढे पाण्यातून 
बुडतांना ||
सुखाचे तोरण 
जीवनी बांधून
सांगतो हसून 
बघ जिणे ||
आतले ते दार
कधी उघडेन 
भेट ती घडेन  
उराउरी ||
विक्रांता खेळणे 
कळले जगणे 
दत्तरुपी होणे 
लीन आता ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे





गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

मुराळी चाहूल




करावा उपाय तुम्ही काही एक
माहेरास लेक बोलवावी ||
कशास कौतुके लोटले सासरी
नाती वरवरी जोडीयली ||
भ्रतार घराचे जरी सुख असे
मन त्यात नसे माऊलीये ||
पाठविले तुवा सोशीन हा भार
तुझाची आधार सर्वकाळ ||
परी आठवण फुटता मनात
बोलाव परत काही काळ ||
मग मी नांदेन तुजला स्मरून
येवू न देईन बोल काही ||
डोळ्यात काहूर विक्रांत व्याकूळ
मुराळी चाहूल घेत असे ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...