गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

दत्तखुळा








मनाच्या एकांती तुझी याद येते
कानात गुंजते नाव तुझे ||
स्वप्नाचे आकाश भरून मानस
तुझा सहवास अनुभवे ||
कधी येता जाग कुण्या मध्यरात्री
तुझे भास गात्री जाणवती ||
तुझे वेड तूच देवून जागवी
भ्रमिष्ट चाळवी जन्म माझा ||
आता हरू द्यावे हे माझे मी पण
जगण्या कारण तूच होई  ||
विक्रांत विज्ञानी झाला दत्तखुळा
म्हणे गोतवळा शिकलेला ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

पुंजका जाहला उर्जेचा






सरतोय काळ कळल्यावाचून
देहात स्पंदन 
नांदे गूढ ||१ ||
नामाचा धबाबा कधी कोसळतो
कधी वाहवतो 
गतायुषी ||२ ||
चालली गंमत दुनिया वेगळी  
अंतर पोकळी 
दुणावली ||३ ||
देहाचे लोढणे मनाचे खेळणे
अवघे मानणे 
जाणीवेचे ||४ ||
पाहतो दुरून पसारा सोडून
पाहणे कळून 
पाहणारा ||५ ||
विक्रांत पुंजका जाहला उर्जेचा
ठोकळा शून्याचा 
घनदाट ||६ ||


विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

अमृत आकांक्षा








धन्य गिरनार
घनगर्द दाट
तिथल्या वनात
राहतात नाथ ||१

सदा सर्वकाळ
वांच्छा ही मनात
जावुनिया तेथे
यावे न जगात ||२

सरो अटाअटी
जन्म कटकटी
लागावी देहास
अलक्ष विभूती ||३

धडाडून मनी
निरंजन धुनी
अनाहत पुंगी
वाजो कणोकणी ||४

मच्छिंद्र मनास
करो आदेशित  
गोरक्ष चित्तास
दक्ष सदोदीत ||५

वसावा निवृत्ती
विरक्त वृतीत
ज्ञानोबा बुद्धीत
समाधी भोगीत ||६

अहाहा जगणे
संपूर्ण लाधावे
आदिनाथ कृपे
श्रीदत्त भेटावे ||७

विक्रांत पाहतो
जागेपणी स्वप्न
अमृत आकांक्षा
आहेत म्हणून ||८

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...