दलदल
******
स्वामीला मानतो तोही पैसा खातो गुरुचरित्र वाचतो तोही भ्रष्ट असतो
भक्त वर परी लुच्चाच असतो
गर्दीत मेंढरांच्या लांडगा फिरतो
असे जीवन हे द्वीधा विभागले
दिसे जगण्याचे नाटक चालले
पण त्यात मन होते छिन्न भिन्न
कळते ना जीवन घडते ना जीवन
आक्रोश त्यातून दुःख पाझरते
सुख खोटे सारे आत्मग्लानी आणते
असे हे जगणे कशास जगावे
सुज्ञास काय ते लागते सांगावे
दत्ताने धरला विक्रांत वाचला
दलदलीत या तरूनिया गेला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .