स्वीकार
*******
जीवनाचा हट्ट कळे आभाळाला सूर्य ओघळला फांदीवर ॥
एक एक पान जळले प्रेमाने
वसंताचे गाणे फुलावर ॥
आयुष्य टांगले होते खुंटीवर
झटकून धूळ नेसू केले ॥
गेले मिरवीत असण्याचे भान
उमटली तान कोकिळेची ॥
जरी अहंकार उभा पायावर
कुबड्याचा भार भूमीवर ॥
अडकला जीव प्राणात बासुरी
स्वीकार अंतरी सर्वव्यापी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .