श्री ज्ञानराज माणीक प्रभू गीता ज्ञान यज्ञातीलअ.१६ श्लोक 6अणि 7 विवेचना मधील काही मुद्दे.
*********
श्रीजी सांगतात की भगवंतांनी पहिल्या तीन श्लोकात दैवी गुणांचे वर्णन संपूर्णतः केले आहे विस्ताराने केली आहे पुढील चौथ्या श्लोकांमध्ये मुख्य आसुरी गुण सांगून झाल्यावर पाचव्या श्लोकात ते फलश्रुती सांगतात आणि या अध्याय एका अर्थी इथे समाप्त होतो. परंतु त्यानंतर भगवान आसुरी गुण अधिक विश्लेषण करून सांगत आहेत
शौच या गुणाचे विश्लेषण करताना श्रीजी सांगतात की शौचाचा अर्थ स्वच्छता आणि पवित्रता असा आहे. वर सांगितल्याप्रमाणे आपल्या वाणी मध्ये बोलण्यामध्ये आचरणांमधे स्वच्छता हवी शुद्धता हवी
श्री जी एक उदाहरण देतात ते म्हणजे आपण बुट घालून घरी जेवतो का ?त्याचे उत्तर नाही असेच असते . परंतु हॉटेलमध्ये समारंभात बराच वेळा आपण बुट घालून जेवतो. खरंतर हे अयोग्य आहे कारण जेवण करणे हे एक यज्ञकर्म आहे. या यज्ञ कर्मामध्ये आपल्या पोटामधील अग्नी हे भगवंताचे स्वरूप आहे, त्याच्यामध्ये आपण अन्न टाकत असतो .
जेवत कोण असते शरीर किंवा दुसरा आतमधला कुणी? जर शरीर जेवत असेल असे म्हटले तर मेलेल्या माणसाला खडीसाखर खायला काहीच हरकत नाही. पण तो खडी साखर खाऊ शकत नाही . जेऊ शकत नाही
म्हणजेच शरीरामध्ये जेवणारा दुसरा कोणीतरी असतो सिद्ध होते .
तसेच शुद्ध आचरण म्हणजे काय तर जे धर्मग्राही आहेत ते . जे सारे धर्माने सांगितलेले आचरण. मंदिरात जाणे, तिलक, कुंकू लावणे ,दानधर्म करणे, कुलाचार पाळणे ही सर्व आचरण ही शुद्धी करणारी असतात ती टाळणे लपवणे योग्य नाही .
तर अश्या प्रकारे असुरी गुणाचे लोक हे प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही गोष्टींना जाणत नाही त्यांच्या ठिकाणी शुचि नसते सदाचार नसतो आणि सत्य नसते .
या लोकांना काय करावे आणि काय सोडावे हेही कळत नाही
नीट पाहू गेले तर धर्म आणि मोक्ष ही प्रवृत्ती मध्ये मोडतात तर अर्थ आणि काम ही निवृत्ती मध्ये मोडतात याचे भान आले की आचरण योग्य होऊ लागते आणि हे पुरुषार्थ पालन केले जाते.
सत्य हे धर्माचे रक्षण करते याचे भान आसुरी गुणाच्या लोकांना नसते.