निसर्गदत्त .मी आहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्गदत्त .मी आहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

जाणणे

जाणणे
******

स्वप्न खुळे घडण्याचे
अडविते घडणे रे
माणसाच्या पाठीमागे 
मनाचे या लोढणे रे 

टाकायचे लोढणे हे 
कधी घडतच नाही
टाकायचे यत्न सारे 
सारे लोढणेच होई

कळण्यात लोढण्याला
लोढण्याचा अंत आहे 
घडण्यात घडण्याची 
अन सुरुवात आहे 

जाणणारा जाणतो की
जाणण्यात मुक्ती आहे 
जाणणार्‍या जाणणे
हिच खरी युक्ती आहे 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...