निसर्गचित्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्गचित्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

वीज

वीज
***:
लोभस लाजरी 
तेजस साजरी 
वीज जरतारी 
नभाचे नगरी 

चपळ मासोळी 
लखलखे जळी 
टपोऱल्या डोळी 
आव्हान कट्यारी 

मोकळा संभार 
मेघ भाळावर 
तेजाळ तर्रार 
नयनाचे तीर 

सवे अवखळ 
बाल्यही खट्याळ 
करी कलकल 
झराची चंचल 

झेलावी ही सर 
वाटे क्षणभर 
होय थरथर 
वृक्ष पानावर 

घनघोर वारा 
पळ खिळलेला 
अंतरी बाहेरी 
प्रकाश कोवळा

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...