सुख डोह
********
पाय मी पहावे माझ्या माऊलीचे सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥
मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे
गुणगान गावे वारंवार ॥
अरूपाचे रूप शब्दात वेचावे
हृदयी धरावे सर्वकाळ ॥
माऊली गजर डोळ्यात पाझर
हृदी अनिवार वेडे व्हावे ॥
कोणी म्हणून खुळा कोणी वाया गेला
आळंदी धुळीला माथी घ्यावे ॥
इथल्या सुखाचे सुख वर्णवेना
शब्द उमटेना मुखातून ॥
सुखाच्या डोहात सुख थेंब झालो
सांगण्या उरलो मात बळे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️