किन्नर(अनुवाद)
*****
कुणी म्हणतात
ते आळशी असतात पुरुषागत
अथवा शोषित स्त्रीयांगत
आरसा पाहून हरखून जातात
पण जिवलग मरताच ते
दु:खात डूबतात
अन डोळ्यात त्यांच्या चमकतात
तीच सुखाचे आसवे प्रेम मिळताच
दिलदार असतात ते
अन व्यवहारीही
किन्नर वेगळे असतात
असे कुणी म्हणतात
पण लुटारू तर
त्यांनाही ठार मारतात
.
(कवि ब्रज श्रीवास्तव)
अनुवादक डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
