जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, १५ जुलै, २०१५
सोमवार, १३ जुलै, २०१५
खेळ..
जितुके मी
जवळ यावे
तितुके तू
दूर जावे
का रे असे
खेळ खेळशी
आणि कुठवर
मजला छळशी
इथे धाडसी
तिथे पाडसी
प्राण कंठात
उगा आणसी
असा सदा मी
तुज बोलावतो
व्याकूळ होत
साद घालतो
तुजला नाही
भान कश्याचे
नाट्य सदा
का दुराव्याचे
आता खेळ
असा डाव
तुच भोज्या
तुच धाव
तुच शोध
तुझा तुला
रे माझ्या
या मनातला
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
रविवार, १२ जुलै, २०१५
नकार नाही होकार नाही..
मला डोळे कळतात
प्रत्येकाच्या मनातील
भावही उमजतात
असे मी समजायचो
अन हे सारे सगळ्यांना
छातीठोक सांगायचो
पण ती भेटे पर्यंतच
कारण नंतर मग..
कशाचे काय नि कशाचे काय
मला डोंबलाचे तिचेच काय
कुणाचेच मन कळत नाही
हे अगदी स्पष्ट झाले
का ती भेटल्यापासून
माझे मनच बदलले
कळण्या न कळण्याच्या
अगदी पलीकडे गेले
कुणास ठावूक पण
ही शक्यताही अगदीच
नाकरता येत नाही .
आपलेपणानं ओथंबून
चमकणारे डोळे
मनावर प्रेमाची सावली
धरणारे डोळे
क्षणोक्षणी अस्तित्व जाणवून
देणारे डोळे
जाता जाता निमिषभर
थबकणारे डोळे
डोळ्यात डोळे मिसळता
उजळणारे डोळे
कीती शोधले पण
कधी दिसलेच नाही
बरे नाहीतर नाही
निदान दिसावेत म्हटले
सदा नाकारणारे थंड
निर्विकार डोळे
पाहूनही न पाहता दूर
वळणारे डोळे
परकेपणाची सीमारेखेत
जखडलेले डोळे
अहंकाराचा फणा ठाम
ठेचणारे डोळे
वा निकाल लावून नीप
तोडणारे डोळे
पण तसेही कधी काही
दिसले नाही मला
ते डोळे भेटायचे रोज
सुप्रभात म्हणत
बोलायचे हसायचे अगदी
फॉर्मल वागत
नकार नाही होकार नाही
आणि पाणी केवळ
राहायचे डूचमळत
वारे आले नाही
बोट हलली नाही
वादळ आले नाही
बोट बुडाली नाही
अश्याच एका दिवसानंतर
ती सुद्धा कधीच आली नाही
मला डोळे कळतात असे मग
मी कधीच म्हटले नाही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
परिक्रमा
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...
-
जैसा गरुड तो नेतो उचलून मासा अलगत पायी पकडून तैसे मजला घेई ओढून दत्तराज खग बलिष्ठ होऊन सुखासीन मी या जगतात हरवून गेलो माझ...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
कल्पद्रुमा *** मज दत्तराया छळते ही काया जन्म जाई वाया तुजविन ॥ जैसे रक्षिलेस मच्छिंद्र गोरक्षा तैसा मज रक्षा भगवंता ॥ जैसे प्रेम दिले जा...
-
मावुली ***** तृषार्थ जगता पाहुन द्रवला कृपा अंकुरला महावृक्ष जरी विश्वाकार देहात कोंडला अन बहरला घनदाट ॥ बीज करूणेचे बीज चैतन...
-
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...
-
चाले पायवाट ********** निर्वाणीचे हासू दाटले डोळ्यात दीप अंधारात दिसू आला ॥ . दूर कोठेतरी हंबरती गाय तटतटे सय अंत...
-
उचला झाडू साफ करा दान सक्ती श्रम करा झाडूवाला जातो पळून वरवरचा पाला लोटून त्याला काम सांगू नका युनिअनला चिथवू नका ...
-
श्रीपाद वल्लभ *********** दुर्जन भंजक सज्जन रक्षक भक्तोधारक श्रीपाद वल्लभ विश्व उद्धारक जगात पालक भक्त तारक श्रीपाद वल्लभ ...
-
आलो गिर नारी देवा हाक ऐकून आतली धाव धावून प्रेमाने जिवलग म्यां पाहिली आधी भेटलो शिवाला भवनाथांच्या रूपाला धूळ ...


