जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६
बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६
निकी वाट
मातेवीन गर्भ
पित्यावीन जन्म
येरे येणजाण
अर्थहीन ||
जगाचा पसारा मनात
साठला
आला काय गेला कुणा
कळे ||
जगताचे मूळ मनच
केवळ
कळला पोकळ रंभागर्भ
||
सुखाचा तो सोस
दुखातला वास
केवळ आभास
चलचित्र ||
मावळता मन जगताचा
अंत
पाहतो अनंत
आत्मरूप ||
तोच पाहणारा गेला
हरवून
जगणे कळून क्षणगामी
||
विक्रांता दाविली
नीट निर्देशून
दत्ताने येवून वाट
निकी ||
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in
रविवार, २ ऑक्टोबर, २०१६
आत्मराज
दत्त नाम घेता
प्रेम दाटे उरी
सुख डोळ्यादारी
ओघळते ||
जिवलग माझा
जीवाचा तो जीव
स्वानंदाची ठेव
आत्मराज ||
जन्म चालवितो
संकटी रक्षितो
पाठीशी राहतो
सदोदीत ||
मागीतल्यावीन
दिधले अपार
जगण्याचे सार
दावियले ||
तयाचा मी ऋणी आहे
जन्मोजन्मी
काया ओवाळूनी
टाकीयली ||
दयाळा कृपाळा
विक्रांता सांभाळा
धरावे हाताला आजन्म
या ||
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in
जन्म सापडत नाही
जन्म सापडत नाही
.
रातराणी गंध आता
मनी उमलत नाही
रंगविली स्वप्न जुनी
आता आठवत नाही
दूरवर नजरेत
सखी दु;ख पेटलेले
आतड्यात भूक अन
जन्म सापडत नाही
जीवनास माझे म्हणू
ठेवू किंवा कोपऱ्यात
गोठलेल्या वेदनेस
काही समजत नाही
कालचेच गाणे जरी
सुर हरवले आज
फुंकूनही प्राण शब्दी
अर्थ उमटत नाही
हरवली दिशा अन
दुरावली साथ तुझी
भोवताली रात दाटे
सोबतीला हात नाही
ध्यास जरी सराईचा
वाट हि सरत नाही
जडावले पाय अन
गाव ही दिसत नाही
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
.
रातराणी गंध आता
मनी उमलत नाही
रंगविली स्वप्न जुनी
आता आठवत नाही
दूरवर नजरेत
सखी दु;ख पेटलेले
आतड्यात भूक अन
जन्म सापडत नाही
जीवनास माझे म्हणू
ठेवू किंवा कोपऱ्यात
गोठलेल्या वेदनेस
काही समजत नाही
कालचेच गाणे जरी
सुर हरवले आज
फुंकूनही प्राण शब्दी
अर्थ उमटत नाही
हरवली दिशा अन
दुरावली साथ तुझी
भोवताली रात दाटे
सोबतीला हात नाही
ध्यास जरी सराईचा
वाट हि सरत नाही
जडावले पाय अन
गाव ही दिसत नाही
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
भय
भय *** किर्र निर्मनुष्य अश्या जयंती माता जंगलात मऊ मातीत उमटलेली ताजी व्याघ्र पावुले अन् एकटेपणी चाललेली माझी परिक्रमा . वि...



