शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

माझी हि अक्षर







माझी हि अक्षर | उधार बाजार |
रसिका स्वीकार | केली तुम्ही || १ ||
पुरविली हौस | लिहण्याचा सोस |
केलेले सायास | कामी आले ||२ ||
झाला कृपावंत | शाबासी दिलीत |
न्हालो कौतुकात | पुनःपुन्हा ||३||
कधी आणियेला | तुम्हाला कंटाळा |
उगाच मांडला | पसारा हि ||४ ||
कधी सुख दु:ख | सांगून रडलो |
गळा मी पडलो | बळे कधी ||५||
कधी शब्दातून | कधी शब्दाविन |
गेला थोपटून | प्रेमभरे ||६ ||
ऐसे सांभाळिले | मानून आपुले |
मैत्र हे जागले | हृदयात ||७||
आहे ऋणाईत | तुमचा अनंत |
नमितो विक्रांत | म्हणूनिया ||७||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...