जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे .
डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे.
(अनुवादित)
शनिवार, २० जुलै, २०१९
तृषार्थ पथिक
अवधुता विना काहीच सुचेना मन हे रमेना अन्य कुठे ॥ चातकाची चोच जाहले जगण भेटावे जीवन तया कैसे ॥ कासावीस जीव लागली तहान थिल्लर सेवन घडेचिना ॥ कोसळ बा दत्ता होय दयाघन मज तुजविण अन्य नाही ॥ विक्रांत युगाचा तृषार्थ पथिक आसरा क्षणिक हृदयी दे ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा