शुक्रवार, ६ मार्च, २०२६

स्वामी पूर्णानंद (खिडकितला देव)

स्वामी पूर्णानंद (खिडकितला देव)
****************
तुझिया दारात 
येवून थांबलो 
स्वामी पूर्णानंदा
प्रेमाने भेटलो

चालता बोलता 
देव तू सकला 
कृपावंत व्हावे 
तारावे मजला 

नित्य निरंजनी 
तदाकार वृत्ती 
निर्गुण सगुणा 
आले जणू वस्ती 

साई कुंडी स्वामी
सवे नित्यानंद 
पाहता मनात
जाहला आनंद

दिल्या विना तुज 
काय मागू देवा
जगताने काय 
द्यावे सूर्य देवा 

विक्रांत पदी या 
करतो याचना 
कृपेचा कटाक्ष 
टाकी जनार्दना

विक्रांत प्रभाकर तिकोने 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...