शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

काठावर



काठावर
******
जो आत तोच बाहेर
तरी शोध काठावर 
काय करू कसे करू
प्रेम जडे मैयैवर

तेच पाणी पुन्हा पुन्हा 
येत असे डोळ्यावर 
देणे घेणे प्रवाहाचे
सुख मिळे घाटावर 

तो चाकरमानी खुळा 
धाव घेई उत्तरेला
लहरीत हरवून
काळ  पुसे मनातला

प्रेमाचेच झाड होता
प्रेमे बहरून आला
लाख कोटी नाती आता 
देणे असे प्रवाहाला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...