- दादा गावंड यांची कविता (अनुवाद) edited*******************मन हे भटकते तया भटकू देराहुनिया शांत तया पाहून घे ॥१बाहेर धावून करी ते व्याकूळपरी स्तब्ध रहा अंतरी निश्चळ ॥२राहू वाहू दे हे मन नि विचारव्यस्त सदोदित आणीक अपार ॥३जाणीव निश्चल अलिप्त नि शांतआपुलिया आत सदा अखंडित ॥४सौर्य मंडलास सदैव भ्रमणसूर्य परी राही ढळल्या वाचून ॥५धावू दे इंद्रिय इंद्रियाच्या अर्थीहोवो कासावीस मन मेटाकुटी ॥६परंतु ती ऊर्जा असू दे अलिप्तधावू देत मन निरखी त्या शांत ॥७फुटतात लाटा अनंत वरतीअंतरी सागरा गांभीर्य नि शांती ॥८भटकती मेघ सर्व जगतातपरी आकाश ते पवित्र निस्तब्ध ॥९घटती घटना घडो जीवनातराही अंतरी तू सावध निवांत ॥१०बडबडे मन सदैव बेशिस्तठेव आकलन शांत मी दुरस्थ ॥११प्रखर प्रदग्ध पाहणे घडताशांती व नम्रता उलगडे चित्ता ॥१२अरे तू आकाश असीम अनंतनच पसरले मेघ अस्ताव्यस्त ॥१३सावध सुधीर संवेदनशीलआहेस तू साक्षी तुच जाणशील ॥१४क्षणिक स्मृती नि क्षणिक विचारनाहीस रे तू जाण हे साचार ॥१५सखोल गंभीर प्रचंड सागरतरंग ना तू जो दिसे वरवर ॥१६असेअविचल सूर्य तू महाननच उपग्रह विचार भ्रमण ॥१७तूच तूच आत शाश्वत नि स्थिरविनाशी ढसाळ दिसे जै बाहेर ॥१८अनंत अव्याप्त असा जो शाश्वतअजन्मा प्राचीन असा तू रे फक्त ॥१९तत तत्व असी तूच असे तो रेतत तत्व असी तूच असे तो रे ॥२०तुझ्यातील ते हे सदा तुझे व्हावेजाणीवी जाणीव सारे उजळावे ॥२१कालाच्या अतीत दिव्य अनुभूतीअक्षय अवीट यावी तुझे हाती ॥२२मूल्यवान अशी घटिका ही आहेमूल्यवान क्षण आताचाच आहे ॥२३करी हे चिंतन धरी रे तू ध्यानघेई तू जाणून आपल्या आपण ॥२४दिव्य ते आपले अंतर जाणूनशाश्वत नित्य घे स्वरूप पाहून ॥२५🌾🌾🌾© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणेhttps://kavitesathikavita.blogspot.com
- स्तब्ध रहा तू रे निष्चल
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
मंगळवार, २८ जानेवारी, २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रार्थना
प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन देखीले सगुण परब्रम्ह हास्य मुग्ध मुखी हात उंचावले आशिष भरले प्रेममय परमपवित्र ...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन देखीले सगुण परब्रम्ह हास्य मुग्ध मुखी हात उंचावले आशिष भरले प्रेममय परमपवित्र ...
-
महात्मा ज्योतिबा फुले ****** ज्योतीबा, तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत जगत आहोत आम्ही समतेची स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत आम्ह...
-
चांदणे **** भिरभिरणारे खुळे हरिणीचे काळे डोळे डोकावता तयामध्ये मन झाले चिंब ओले ॥१ एक थवा पाखरांचा उंच मेघापार गेला अन शब्द हर...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
सुटता सुटता आयुष्याच्या या वळणावर हवे नकोपण झाले धूसर तरीही दाटता क्लेश भोवती पुन्हा वाटते जावे दूरवर जरी वाटतो सुटला सुटला दि...
-
माझे वेडे शब्द वाचू नका कुणी उरात टोचणी लागेल बा ||१ || सदैव छळेल जीवनाचे कोडे अरुपाचे वेड डोईवरी ||२ || थांब...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
निरागस चेहरा ********** हासून पाहणारा निरागस चेहरा हसऱ्या ओठांचा दुमडला कोपरा || चांदण्यांचे स्वप्न गात ...
-
तो भेटतो ******* तो न भेटतो जपाने तो न भेटतो तपाने तो भेटतो केवळ रे फक्त त्याच्याच कृपेने ॥१ तो न भेटतो पूजेने तो न भेटतो गाय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा