जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
जिभेचे जिव्हार ************ काय सांगू बाई जिभेचे जिव्हार चवीला अपार लाचावले ॥१ पाहुनिया गोड तया ये उधाण जातसे वाहून गोडीत त्या ॥ २ आमरस पुरी विविध त्या खिरी अन् बासुंदीवरी ताव मारी ॥३ कुठेही पाहता भजी तळलेले खातच सुटले अपार ते ॥४ आणि सोबतीला विविध ते वडे पाहताच वेडे होत जाय ॥५ कधी आला ठेचा वाटा भरिताचा तवंग तेलाचा लाल रंगी ॥६ तर मग काही विचारूच नका खाये बकबका पाणी पीत ॥७ बरेच खारट थोडे कडवट तयाला म्हणत नाही कधी ॥८ लोणची पापड कारले कंटोली स्वादही निराळी किती एक ॥९ जणू खाण्यासाठी जन्म हा झाला त्याच त्या सुखाला हपापला . ॥१० अगं हे पुराण संपणार नाही पाने वही वही सरतील ॥११ वाढ लवकर पिठले भाकर जीव तयावर जडलासे ॥१२ विक्रांत दरवळी झाला असे दंग वास तो खमंग भाजलेला ॥१४ बाप गजानन देत असे खूण हेच रे संपूर्ण परब्रम्ह ॥१५ 🌾🌾🌾 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा