शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

दत्तराज



साकारी नटला
प्रकाशी भरला
असुनी नसला
दत्तराज ||

सोहं सांगाती
प्राणाचीया गाठी  
लहरी उठती
स्वानंदाच्या  ||

रूप रस गंध
चित्री सजवला
शब्दात ठेविला
नाद रूपे ||

असे दिगंबर
कृपेचा तो मेघ
सर्वांगात ओघ
स्पंदनांचा ||

कळू आले सुख
आता माझे मला
विक्रांत बुडाला
चैतन्यात  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...