सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

मेघा...







मेघा बरस बरस
माझे पेटलेले श्वास
त्याची मिटव रे आस

मेघा ठिबक ठिबक
जैसा लिंगी अभिषेक
बीज शोधत एकेक

मेघा ओघळ ओघळ
गच्च दाटून आचळ
शुभ्र सतेज फेसाळ

मेघा बेभान बेभान
दाट माजवून रान
देई जीवनाचे दान 

मेघा सावर सावर
तुझे तांडव आवर
माझे मातीचेच घर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...