जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, २७ जुलै, २०१६
शनिवार, २३ जुलै, २०१६
श्रावण
आजकाल श्रावणात
मन ओले होत नाही
चिंब ऋतू भोवताली
डोळा पाणी येत नाही
लाख सुखे लगडली
देहास भिडत नाही
वृथा छंद जीवास का
लागला कळत नाही
समजेना का अजुनी
मना उमजत नाही
श्वासामध्ये
भिनलेले
स्वप्न हे जळत
नाही
तप्त अथांग
तृष्णा ही
जीवना सोडत नाही
वर्षावात जळे जन्म
हृदयात दत्त नाही
डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोने
kavitesathikavita.blogspot.in
kavitesathikavita.blogspot.in
शुक्रवार, २२ जुलै, २०१६
एक फेसबुक फ्रेंड
तू भेटलीस अन
माझ्या
जीवनाचा पासवर्डच
बदलला
अन मग पुन्हा
पुन्हा लॉगीनचा
सिलसिला सुरु
झाला
तुझ्या
माझ्यामध्ये हॅकिंगला
कुणालाच जागा
नव्हती कधी
तुझी माझी अगदी गट्टी
फायरवाल मधली
होती
व्ह्यायरस
मालवेअर वगैरे
तर फार लांबच्या
गोष्टी होत्या
व्हॉटसप फेसबुकवरील
भेटी
त्या अगदी
नित्याच्या होत्या
काय काय शेअर
केले मी तुला
कविता चित्रांनी
वॉलच भरून टाकला
नको त्याही
गोष्टी सांगून टाकल्या
हसत पण तू सावरून
घेतलेस मला
पण तरीही तू कधी
भेटली नाहीस
अन भेटायला ये म्हटली
नाहीस
पण खरच सांगतो
त्याची
गरजही मला वाटली
नाही
मायावी हे जग असते
सारे
असे म्हणतात
ज्ञानी सगळे
तसे तर जगणेही
व्ह्र्रच्युअलच असते
हे ही मी होते कुठेतरी
वाचले
मग जी मला वाटते
अन भेटते
तू तीच नसशीलही
कदाचित
अन मलाही दिसतो
तसे
जाणत नसशील तूही कदाचित
पण तुझ्या माझ्या
भेटण्याने
जगणे किती वेगळे
झाले
एक नवा आयाम जीवनाला
अन खोली कळण्याला
देवून गेले
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
दिगंबर आजबे
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
-
दत्त रिक्त ******** दत्त भूत विसरला दत्त भविष्य नसला दत्त अस्तित्व होऊन याचं क्षणात साठला दत्त नाठवे मनाला दत्त नाठवे तनाला द...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
मनाचा सुमार चालला बाजार नच अंतपार याला दत्ता ॥ हवेपणाला या अंतर पडेना स्वप्नांची सरेना मोजदाद ॥ एक मिळताच चिकटे ...
-
आणि अचानक जाती हरवून मित्र प्रियजन विषाणूने ॥ कुणी काल झाले इथे रिटायर गावातले घर डोक्यामध्ये ॥ कुणी जीवनाच्या उभा मध्यावर ...
-
आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणो वाहतो कविता तुझ्यावरी लिहून सुखी होतो तुला खुश करतो का मीच ...
-
करतो वल्गना भक्तीच्या वाचाळ रिता मी पोकळ ढोल जगी || दुमदुमे जगी बसे कानठळ्या आवेशी आरोळ्या घुमे स्वरी || कळतोय...
-
वृक्ष ******* जेव्हा पडे बीज उत्तम मातीत सहज रुजत फळा येते ॥१ सफळ होताच पुण्यकर्म सारी बघ मुक्ती चारी घरी येती ॥२ तरारून...


